मार्केटयार्ड ते मुठा बस सुरू करा

मुळशी शिवसेनेचे पीएमपीएमएल अधिकाऱ्यांना निवेदन

पिरंगुट-पीएमपीएमएलची चालू असलेली डेक्कन ते कोंढुर फाटा बस सेवा ही आणखी तीन किलोमीटर वाढवून ती मुठा गावापर्यंत करण्यात यावी अशी मुळशी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधी पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मुठा खोऱ्यामध्ये पीएमपीएमएलची बस सेवा डेक्कन ते कोंढुर फाटा अशी आहे. ही गाडी ही डेक्कनऐवजी मार्केटयार्ड ते मुठा अशी करण्यात यावी, ही प्रामुख्याने मागणी मुठा खोऱ्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या येत असलेल्या बसचा शेवटचा थांबा हा कोंढुर फाटा आहे. येथून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर मुठा हे गाव आहे. त्यामुळे शेवटचा थांबा हा कोंढुर फाट्याऐवजी मुठा गाव व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे. यामुळे मुठा खोऱ्यातील मुठा, जातेडे, कोंढुर, माळेगाव, वाजंळे, वातुंडे, कोळावडे, लव्हार्डे, आंदगाव, खारावडे, भरेकरवाडी अशा वेगवेगळ्या गावातील व वाड्यावस्त्यांमधील नागरिक, कामगार व विद्यार्थी वर्गाला तसेच व्यापारी वर्गाला याचा मोठा फायदा होईल. या भागातील असलेले आरोग्य केंद्र हे मुठा ते पोटेवाडी फाटा या दरम्यान असून, ग्रामस्थांना या ठिकाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे वाहतुकीचे साधन नसल्याने स्वतःचे वाहन नसणाऱ्या नागरिकांना आजारपणात सुद्धा या ठिकाणी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे पीएमपीएल बसचा शेवटचा बस स्टॉप हा कोंढुर फाटाऐवजी मुठा गाव होणं हे खूप गरजेचे आहे.

यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दत्तात्रय टेमघरे, अमृतेश्वर विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत कुडले, विभागप्रमुख तानाजी हाळंदे, भोर विधानसभा मतदार संघ युवासेनेचे कार्याध्यक्ष अविनाश कानगुडे, युवासेनेचे अमित कुडले, विद्यार्थी सेनेचे उपसंघटक सुभाष कानगुडे, युवासेनेचे विभागप्रमुख समीर शिंदे उपस्थित होते. मुठा खोऱ्यातील नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पीएमपीएमएलची बससेवा ही कोंढुर फाटाऐवजी मुठा गावा पर्यंत करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे; परंतु या निवेदना नंतरही बस सेवा मुठा गावापर्यंत सुरू न केल्यास शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे अमित कुडले यांनी दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)