“भीमाशंकर’मध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात

श्रावण यात्रेसाठी देवस्थानसह प्रशासन सज्ज : 10 अधिकाऱ्यांसह 75 पोलिसांचा बंदोबस्त

राजगुरूनगर : खेड तालुक्‍यातील श्रीक्षेत्र डाकिन्या भीमाशंकर श्रावणी यात्रेनिमित्ताने मंदिर परीसरात 10 अधिकाऱ्यांसह 75 पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तसेच बॉंम्ब शोधक पथके कार्यरत झाली असून प्रशासकीय सर्व यत्रंणा सज्ज झाली असून देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.

राजगुरूनगर येथे तहसीलदार कार्यालयात श्रावणी यात्रेची पूर्व तयारीची बैठक प्रांताधिकारी संजय तेली, देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, राहुल काळभोर, निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. टी. डाके, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एन. एन. घोटुळे, वनपरीक्षेत्र अधिकारी बी. आर. झगडे आदिंसह देवस्थानचे विश्‍वस्त, खेड आणि आंबेगाव तालुक्‍यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सोमवार (दि. 5) पासून महिनाभर भीमाशंकर यात्रा सुरू होत असून राजगुरूनगरमार्गे जाणाऱ्या भीमाशंकर रस्त्यावर मंदोशी घाट रस्ता खचल्याने हा मार्गे बंद झाला आहे. त्यामुळे मंचर मार्गे भीमाशंकर जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात येणार आहे. भीमाशंकर परीसरात चार वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथुन एसटी महामंडळाच्या वतीने 20 नवीन मिडी बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तर शुक्रवार ते मगंळवारपर्यंत जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवरुन जादा बसेस सोडण्यात येणार आहे.

प्लॅस्टिक जनजागृती आणि पायरी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आली असून दर्शनबारीतील भाविकांना त्रास होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे. मुखदर्शनाच्या सोयीसाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्यामुळे सोय झाली आहे. पाण्यासाठी टॅंकर लावण्यात आले असून भाविकांनी प्लॅस्टिक कचरा इतरत्र टाकू नये म्हणून जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहे. देवस्थानच्यावतीने भाविकांसाठी दर्शनपास उपलब्ध करुन दिले आहे.

  • हुल्लडबाजी, अवैध धंद्यावर निर्बध
    भीमाशंकर अभयारण्याच्या परिसरात हुल्लडबाजी, अवैध धंदे यांच्यावर पोलिसांनी कडक निर्बध लावले आहेत. तसेच प्लॅस्टिक कचरा, खाद्यपदार्थ तपासणी करुन योग्य ती दक्षता घेतली जात आहे.
  • धोकादाय ठिकाणी उयाययोजना
    मंदिर परिसरात आरोग्य पथकात 45 कर्मचारी आणि डॉक्‍टर दिवसरात्र पाळीत आरोग्य सेवा देणार असून दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या परिसरातील वीजपुरवठा खंडीत होऊ नये म्हणून 20 विद्युत कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. मंचर-भीमाशंकर मार्गावरील खड्डे बुजवुन, धोकादायक ठिकाणे निश्‍चित करुन उपाय योजना करण्यात आल्या आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.