वीजवाहक तारेचा धक्का लागून गायीचा मृत्यू

पेठ ( प्रतिनिधी ) : सातगाव परिसरातील थुगावडोह-कुदळवाडी (ता. आंबेगाव) येथील गणेश कांताराम कुदळे या शेतकऱ्याची दोन महिन्याची गरोदर गाय वीज वाहक तारेचा धक्का लागून मृत्यमुखी पडल्याची घटना आज 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे.

कुदळवाडी परिसरातील थुगावडोह येथील शेतकरी गणेश याची गायी शेताच्या परिसरात चरत होती. हा भाग चढ उताराचा असल्याने चढावरील भागात गायीचे शिंग विज वाहक तारेला स्पर्श होऊन गायी मृत्यूमुखी पडल्याचा संशय व्यक्त होत आहे. यात कुदळे यांचे साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे.

या घटनेचा रीतसर पंचनामा वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता किशोर खलाने, पोलीस हवालदार राजेंद्र हिले, गणपत डावखरे, गावकामगार तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला असून या शेतकऱ्याला विजवीतरण कंपनीकडून भरपाई मिळवून दिली जाईल, असे कनिष्ठ अभियंता खलाने यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.