बालिकाश्रम रोडवर भरदिवसा घरफोडी

नगर: घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोएंडा तोडून अज्ञात चोराने घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 32 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बालिकाश्रम रोडवरील गायकवाड मळा येथील चिंतामणी हॉस्पिटलमागे आनंद एनक्‍लेव्ह येथे रविवारी (दि.26) दुपारी 2.30 च्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र गंगाराम जोग (वय 57, आनंद एनक्‍लेव्ह, चिंतामणी हॉस्पिटलमागे, गायकवाड मळा, बालिकाश्रम रोड) हे त्यांच्या कुटुंबासह कामानिमित्त बाहेर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कडी कोएंडा उचकटून आत प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक करून बेडरूममधील कपाटाच्या लॉकरमधून पाच तोळे सोन्याचे दागिने, अडीच हजार रूपये रोख रक्कम व दोन सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी तोफखाना पोलीसांनी राजेंद्र जोग यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पांढरे या करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.