प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीचे इक्‍बाल मिर्चीसोबत आर्थिक व्यवहार? : सांबीत पात्रा

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि दाऊद इब्राहीमचा जवळचा सहकारी इक्‍बाल मिर्ची (मेमन) यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहाराबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सांबीत पात्रा यांनी केली.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केलेल्या संशयास्पद व्यवहारावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसला लक्ष्य केले. प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांनी “मिलेनीयर डेव्हलपर’ या कंपनीच्या माध्यमातून इक्‍बाल मिर्चीशी केलेल्या व्यवहाराची सक्तवसूली संचालनालयाकडून सुरू आहे. गेले दोन दिवस देशभरातील प्रसारमाध्यमांनी याबाबतच्या बातम्या प्रसारीत केल्या आहेत. या बातम्यांवरून असे दिसते की मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील त्यावेळच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी इक्‍बाल मिर्चीशी मालमत्ता खरेदी व्यवहार केला होता. ही बाब गंभीर असून राष्ट्रवादी कॉंग्रेस नेतृत्वाने दाऊद टोळीशी असलेल्या पटेल यांच्या संबंधाबाबत खुलासा करण्याची गरज असल्याचे पात्रा म्हणाले.

पटेल यांच्या या व्यवहाराची माहिती त्यांनी लढवलेल्या निवडणूकीच्या वेळी का लपवली, याचाही खुलासा होणे गरजेचे आहे. प्रफुल्ल पटेल आणि इक्‍बाल मिर्ची यांच्यातील व्यवहाराची माहिती त्यावेळच्या मनमोहन सिंग सरकारला नव्हती का असा प्रश्न करताना, संबीत पात्रा यांनी आंतरराष्ट्रीत गुन्हेगारी टोळीशी संबंध असलेल्या व्यक्ती बरोबर केंद्रीय मंत्र्याने आर्थिक व्यवहार करणे म्हणजे देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्यासारखेच असल्याचा आरोप केला.

या व्यवहाराची माहिती त्यावेळच्या तपास यंत्रणांना नक्कीच असेल. मात्र ही माहिती जाहीर होऊ न देण्यासाठी तत्कालीक पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी दबाव आणला होता का हेही स्पष्ट होणे आवश्‍यक आहे. ज्यापक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचे दाऊद टोळीतील गुन्हेगारांशी आर्थिक संबंध आहेत अशा पक्षाशी असलेली आघाडी कॉंग्रेस चालू ठेवणार का याचा खुलासा सोनिया गांधी यांनी करावा अशी मागणीही त्यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)