अभिजित बॅनर्जी अमर्त्य सेन यांचे निकटवर्तीय

नवी दिल्ली : अर्थशास्त्राचे नोबेल मिळवणारे भारतीय-अमेरिकन अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी हे 1998मध्ये नोबेल मिळवणाऱ्या अमर्त्य सेन यांचे जवळचे मित्र आहेत, अशी माहिती त्यांची आई निर्मला बॅनर्जी यांनी दिली.

या दोघांच्यात खुप प्रेमाचे संबंध होते. अमर्त्य यांची पत्नीही अभिजित आणि इश्‍तर यांच्यावर खूप प्रेम करते. त्यांचे नेहमी घरी येणे जाणे असते. त्यांच्या नातेसंबंधात भावनेचा ओलावा आहे. अभिजित वर्षा -दीड वर्षाचा असल्यापासून अमर्त्य त्याला ओळखतात. त्यावेळी अभिजितचे वडील फेलो म्हणून बर्कलेला होते. तेथे अमर्त्य सेनही होते. आमच्या दोनी कुटुंबाचे खूप जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते, असे त्या म्हणाल्या

शाळेत अभिजित काही पहिला येणारा विद्यार्थी नव्हता. पण अनेक प्रातांत त्याला रस होता. त्याला गायला आवडायचे. टेबल टेनीस आणि टेनीस तो खेळायचा. खूफ छान नाही पण खेळायचा. तो खूप छान स्वयंपाक केतो. अनेक सेशांतील खाद्य पदार्थ त्याला उत्तम बनवता येतात. त्याला लोकांच्यात स्वारस्य होते. तो कूप तार्किक पध्दतीने विचार करतो, अशा आठवणीही त्यांनी सांगितल्या.
अभिजितला नोबेल मिळाल्याचे त्याने मला अजून सांगितले नाही. मला त्याच्या लहान मुलाने ही गोड बातमी दिली. मला आधी का सांगितलं नाहीस असं त्याला भेटल्यावर मी विचारणार आहे, असे त्या म्हणाल्या.

त्याला नोबेल मिळेल असे मला वाटले नव्हते. किंवा तशी माझी अपेक्षाही नव्हती, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.