पुणेकरांनी घेतले स्वातंत्र्यवीरांच्या खोलीचे दर्शन

विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त अभिवादन


फर्गसन महाविद्यालयातील विविध वस्तूंची पाहणी

पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त फर्गसन महाविद्यालयातील खोलीचे पुणेकरांनी दर्शन घेतले.

फर्गसन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना सन 1902 ते 1905 या कालावधीमध्ये सावरकर वसतिगृह क्रमांक एक मधील खोली क्रमांक 17 येथे वास्तव्यास होते. या खोलीमध्ये सावरकरांचा पलंग, खुर्ची, वकिली करीत असताना परिधान केलेले दोन गाऊन ठेवण्यात आले आहेत. खोलीच्या भिंतीवर सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग चित्ररुप करण्यात आले आहेत.

जयंतीनिमित्त शहरातील सावरकरप्रेमींनी मोठ्या संख्येने खोलीला भेट देऊन सावरकरांना अभिवादन केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संचालक प्रमोद रावत, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, डॉ. मोहन आगाशे, पंडित वसंतराव गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. स्वाती जोगळेकर आणि प्रा. आनंद काटिकर यांनी संयोजन केले.

याप्रसंगी संचालक ऍड. नितीन आपटे यांचे “सावरकरांचे कार्य कर्त्तृृत्व’ या विषयावर व्याख्यान झाले. तर शाहीर हेमंत मावळे आणि सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.