नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात निवेदन

राधाकृष्ण विखे पाटील विखे यांचे मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा घडून आणण्याचे आश्वासन

जेजुरी- राष्ट्रीय नाभिक महासंघ सलग्न महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने नाभिक समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले. विखे पाटील यांनी दहा-पंधरा दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र नाभिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घडवून आणून मागण्यांसंदर्भात चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे यांनी दिली.

नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समाविष्ट करून सर्व सवलतींचा लाभ समाजाला मिळावा, शूरवीर जिवाजी महाले यांचे स्मारक प्रतापगड किंवा परिसरात उभारावे, पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर येथील नरवीर शिवाजी काशीद यांच्या स्मारकाजवळ सभागृह बांधून त्याला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जन्मस्थळी माथेरान येथे भाई कोतवाल यांच्या जीवन संघर्षावर आधारित शिल्पकृतींचे दालन उभारावे, नाभिक समाजासाठी व्यवसायवृद्धी, उभारणी व नूतनीकरण आणि प्रशिक्षांसाठी आर्थिक मदत मिळविण्यासाठी मध्यप्रदेश, हरियाना आणि राजस्थान सरकारप्रमाणे केशकला बोर्ड (महामंडळ) स्थापन करावे, या महामंडळावर नाभिक समाजाच्या व्यक्तींची नेमणूक करावी, नाभिक समाज्यास राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, या मागणीचे निवेदन लोणी येथे राधाकृष्ण विखे पाटील यांना समाजाच्या वतीने देण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे, उत्तर नगर जिल्ह्याचे पदाधिकारी किरण बिडवे, मनोज वाघ, अशोक कोरडे, कोपरगाव समाज अध्यक्ष दिलीप जाधव, नाशिकचे युवा जिल्हा अध्यक्ष राहुल तुपे, भारत गायकवाड, संगमनेर तालुका अध्यक्ष बाबा जाधव, रमेश सस्कर, संजय बिडवे, रामनाथ बिडवे उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.