धोतरा वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने चार बालकांना विषबाधा

मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शिनोली येथे धोतरा वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने चार बालकांना विषबाधा झाली आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी घडली.

शिनोली येथे कांदा काढणीसाठी मिडीची (ता. अकोले) येथून शेतकरी उमेश ढोमसे यांच्याकडे मजूर आले आहेत. कांदा काढणी करीत असताना रस्त्याच्या कडेला अरुण लक्ष्मण झाटे (वय 6), आचल लक्ष्मण झाटे (वय 8), युभांगी शेरु देवकर (वय 5) आणि दर्शना प्रदीप ठाकरे (वय 8) यांनी धोतऱ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना उलट्या होवू लागल्याचे त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना तातडीने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी गणेश पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले. त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉ.संपत केदारे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.