जिल्ह्यात साखर कामगारांचे मेळावे घेणार

समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय : वेतवाढीसाठी संघर्ष करणार

वाघळवाडी- जिल्ह्यातील साखर कामगार समन्वय समितीची बैठक निंबुत येथे नुकतीच पार पडली. यात शासन प्रतिनिधी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी, साखर कामगारांचे प्रतिनिधी अशी त्रिसदस्य राज्यस्तरीय कमिटी गठन करण्याचा विचारविनिमय करण्यात आला. तसेच नवीन वेतनवाढीच्या संदर्भात संघर्ष करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये साखर कामगारांचे मेळावे घेण्याचे धोरण ठरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. त्यावेळी वरील धोरण ठरवण्याताअले.

याप्रसंगी उपाध्यक्ष युवराज रणवरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तावरे, महेश काळे, योगेश हंबीर, तसेच जिल्ह्यातील श्रीनाथ म्हस्कोबा, माळेगाव, छत्रपती, राजगड सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील साखर कामगारांच्या असणाऱ्या आणि अडचणी व समस्यांबाबत आढावा घेण्यात आला साखर कामगार कामगारांना 7 व्या वेतन मंडळाची मुदत 31मार्च 2019 ला संपली असल्याने नवीन वेतनवाढीच्या करारासाठी राज्यपातळी असलेल्या वेतनवाढीच्या प्रश्‍नावर झालेल्या कारवाईची माहिती तात्यासाहेब काळे यांनी दिली.

या बैठकीचे नियोजन सोमेश्‍वर कारखान्याचे कामगार संचालक प्रतापसिंह काकडे यांनी केले होते. याप्रसांगी कामगारांचे नेते पुरुषोत्तम परकाळे, बाळासाहेब गायकवाड, पतसंस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, भरत लकडे, भाऊसाहेब शेंडकर, राहुल सोरटे, विश्‍वास मगर, अजय चव्हाण, धनंजय खोमणे, प्रवीण भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास जगताप, तर हणमंत भापकर यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.