राजगुरूनगर- पांगरी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रहतारे, पृथ्वी समजावून सांगताना अँड्रॉईड मोबाइलच्या माध्यामतून हुबेहूब त्रिमितीय प्रतिकृती विद्यार्थ्यांना हाताळली. अँड्रॉईड मोबाइलची किमयात विद्यार्थ्यांनी ग्रह ताऱ्यांना स्पर्श केला. येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रहतारे, पृथ्वी समजावून सांगताना शाळेचे शिक्षक संदीप जाधव यांनी विद्यार्थ्यांसमोर मोबाइलद्वारे सूर्यमाला दाखवली.
प्रत्यक्ष सूर्यमाला विद्यार्थ्यांना पहाता येत नसेल तरी त्याची हुबेहूब त्रिमितीय प्रतिकृती विद्यार्थ्यांना हाताळता आली. तर खगोलीय माहिती व सूर्यमालेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. मुलांचे कुतूहल जागृत करण्याचे काम या अशा उपक्रमातून साध्य होण्यास मदत होत आहे.