का? कर्नाटकात का विरोधात राज्यभर निदर्शने

बंगळुरू ; सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात (का)देशभरात आंदोलनाचा भडका उडालेला असतानाच शुक्रवारी कर्नाटकात शेकडो लोकांनी रस्तयावर उतरत या कायद्याच्या निषेधार्थ निदर्शने केली.

कलबुर्गी येथे शेकडो निदर्शकांनी या कायद्याला विरोध दर्शवला. त्यांनी मोर्चा काढत याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले. मात्र या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस आयुक्त एम. एन, नागराज यांनी आयएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या मोर्चाचे नेतृत्व खदिजा बेगम यांनी केले.

अशीच निदर्शने शिमोगा, उडपी, मडिकेरी, बिदर, चिंतामणी आणि बंगळुरू येथे करण्यात आली. शिमोगात मुद्‌लीम मत्ताहिदा महझ या संघटनेनेन निदर्शनांचे नेतृत्व केले. त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे निवेदन सुपुर्त केले.

बंगळुरूत लोकतांत्रिक जनता दलाने या निदर्शनाचे आंदोलन केले. चिंतामणी येथेही शुक्रवारच्या नमाजनंतर लोकांनी निदर्शने केली. तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. बिदर, कडगू येथेही निदर्शकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निदर्शकांनी राष्ट्रपतीना देण्यासाठ निवेदन दिले. उडपीत निदर्शकांनी या कायद्याच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. हा कायदा घटनेच्या विरोधात असल्याने तो रद्द करण्याची मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.