पत्रकाराने केला मूकबधिर विद्यार्त्यासोबत वाढदिवस साजरा

जामखेड : वाढदिवस साजरा करण्याच्या समाजात अनेक चागल्या वाईट परंपरा आहे. या परंपरांना फाटा देत, पत्रकार ओंकार दळवी यांनी निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत फळे,  शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.

 पत्रकार ओंकार दळवी यांनी आपल्या परीवारा सोबत जामखेड येथील ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ संचलित निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत बसुन त्यांच्या अडचणि जाणून घेतल्या. आज समाजात विकलांग लोकाबाबत सहानुभूती दिसून येत नाही.
जे अंधारात आपला मार्ग शोधत आहेत, अशा व्यक्तिंना मदत करून प्रकाशात आणण्याचे सेवाकार्य करणे गरजेचे आहे, हे दळवी परीवाराने दाखवून दिले आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक गणेश गर्जे आपले विचार व्यक्त केले.यावेळी,मधुराणी राऊत. नम्रता राऊत. रोहिणी दळवी. आध्या दळवी . हर्षवर्धन राऊत. पलक राऊत शाळेचे मुख्याध्यापक गणेश गर्जे, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.