पुणे – खासगी वाहनांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी महामंडळाने अफलातून योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाच्या वतीने “वारी लालपरी’ची हे फिरते प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि.17 सोमवारपासून सुरू होणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या पन्नास बसस्थानकांवर हे प्रदर्शन होणार आहे. या माध्यमातून प्रवाशांना एसटीच्या बसेसच्या प्रवासाचे आणि सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.
बोरीवली येथील सुकुरवाडीच्या बसस्थानकापासून या प्रदर्शनाची सुरुवात करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते सांयकाळी 6 या कालावधीत प्रवासी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अन्य नागरिकांना पाहाता येणार आहे.