एकतर्फी प्रेमातून पेटवलेल्या मुलीचे निधन

सीतापुर:  उत्तरप्रदेशातील सीतापुर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून एका मुलीला बुधवारी रात्री पेटवून दिले होते, त्या मुलीचे आज निधन झाले. ती 70 टक्के भाजली होती. तिला लखनौच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. हाजीपुर गावात हा प्रकार घडला होता.

गोलू नावाच्या मुलाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तो या मुलीची गेले अनेक दिवस छेड काढीत होता. पण त्याकडे या मुलीने सातत्याने दुर्लक्ष केल्याने चिडून गोलूने तिला पेटवूनच दिले. या प्रकरणात गोलूच्या विरोधात या मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी तक्रारच दाखल करून घेतली नाही. या प्रकरणी आता वरीष्ठांना जाग आली असून त्यांनी संबंधीत तीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बुधवारी रात्री गोलू या मुलीच्या घरी केरोसीन घेऊन गेला होता. तेथेच त्याने तिच्या अंगावर केरोसिन टाकून तिला पेटवून दिले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×