जम्मू: पाकिस्तानी जवानांनी राजौरीतील प्रत्यक्ष ताबा रेषेनजिक केलेल्या गोळीबारात भारतीय हद्दीतील एक जवान आज शहीद झाला.हा जवान नौशेरा सेक्टर मधील कलासिया गावातील सीमावर्ती पोस्टवर तैनात होता. तेथेच आज सकाळी पाकिस्तानी बाजूकडून तुफानी गोळीबार करण्यात आला. त्यात तो गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले. पण तेथे उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. या गोळीबाराला भारतीय बाजूकडूनही चोख प्रत्त्युत्तर देण्यात आले पण त्यात पाकिस्तानी बाजूचे नेमके किती जण ठार झाले किंवा कसे हे मात्र लगेच समजू शकलेले नाही. राजौरी आणि पुंछ जिल्हयात गेल्या सहा दिवसात पाकिस्तानी बाजूकडून झालेल्या गोळीबारात भारताचे एकूण चार जवान शहीद झाले आहेत.