ईडीच्या केस मध्ये चिदंबरम यांना दिलासा

सीबीआय प्रकरणावरील अर्जावर सोमवारी सुनावणी

नवी दिल्ली: आयएनएक्‍स मीडिया विदेशी गुंतवणूक परवानगीच्या प्रकरणात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना ईडीच्या केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. त्यांना या प्रकरणातील अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. तथापी त्यांच्या विरोधात सध्या सीबीआयची जी केस आहे, त्याचा मात्र अजून निर्णय लागायचा आहे. त्यामुळे चिदंबरम यांना अटकेतच राहावे लागणार आहे. तथापी सीबीआयने जी अटक केली आहे त्याच्या विरोधात चिदंबरम यांनी सुप्रिम कोर्टात जी याचिका दाखल केली आहे त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

न्या, आर, आर बानुमती, आणि न्या. ए. एस बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे त्यांची ही याचिका सुनावणीसाठी आली आहे.
आज त्यांच्या अर्जावर जी सुनावणी झाली, त्यावेळी सरकारी वकिल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि चिदंबरम यांचे वकिल कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकही झाली. न्यायालयाने ईडीच्या केस मध्ये चिदंबरम यांच्या अटकेला संरक्षण देण्यास तुषार मेहता यांनी जोरदार विरोध केला. पण न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद अमान्य करीत चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षण दिले. मात्र सीबीआय प्रकरणाची केस पेंडिंग असल्याने त्यांना कोठडीतच राहावे लागणार आहे. ते सध्या सीबीआयच्या पाच दिवसांच्या कोठडीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×