पिरंगुट- भुकुम (ता. मुळशी) येथील रोहिदास आमले यांना जागतिक कुस्ती संघटनेच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत अव्वल श्रेणी मिळाली आहे. भारतीय कुस्ती महासंघातर्फे सोनिपत (हरियाणा) येथे आयोजित केलेल्या पंच शिबिर व परीक्षेत देशातून 30 पंचांची निवड़ झाली. त्यातील केवळ पाच पंचांना अव्वल (एक्सलंट) श्रेणी मिळाली असून त्यात महाराष्ट्रातील एकमेव पंच रोहिदास आमले यांचा समावेश आहे. पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती महासंघातर्फे रोहिदास आमले यांचा सत्कार करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोहोळ यांच्या हस्ते आमले यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख 21 हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष सागर तांगडे, सचिव मोहन खोपडे, उपसचिव संदीप वांजळे, खजिनदार विठ्ठल मोहोळ, निलेश मारणे, हनुमंत मणेरे, कुस्ती निवेदक बाबाजी लिम्हण, माऊली खोपडे, सागर तांगडे तसेच पदाधिकारी उपस्थित होते. आमले यांनी गेल्या चार वर्षांत तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पंच म्हणून काम चांगली कामगिरी केली आहे.