‘कबीर सिंह’ चित्रपटाबद्दल शाहिद म्हणतो..

मुंबई- अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटाचे शुटिंग नुकतेच पूर्ण झाले असून, येत्या 21 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कबीर सिंह’ हा तेलगूमधील ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. सध्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. दरम्यानयावेळी शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शहीदने यावेळी चित्रपटातील आपल्या भूमिके बद्दल सांगितले तसेच, कियारा आडवाणी हिने देखील पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला आहे. या सिनेमासाठी शाहिद कपूरला दररोज 20-20 सिगारेटी ओढायला लागल्या असल्याचे देखील त्याने सांगितले आहे. चित्रपटात शाहिद एक व्यसनाधिन मेडिकल स्टुडंटच्या भूमिकेत दिसणार आहे आणि त्याच्या मेहनतीने तो नंतर एक सर्जन बनतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. कबीर सिंह चित्रपटात अभिनेत्री कियारा आडवाणी देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वांगा रेड्डी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)