कार्डिफ – विश्वचषक स्पर्धांमधील खराब कामगिरीमुळे ‘चोकर’ समजल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभवाची मालिका खंडित करण्याची संधी आज अफगाणिस्तानविरूध्द मिळणार आहे. पहिल्या विजयासाठी उत्सुक असलेला अफगाणिस्तानचा संघही चमत्कार होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
तत्पूर्वी तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.
दक्षिण आफ्रिका आणि आफगाणिस्तान यांच्यातील सामन्यास कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स या मैदानावर सुरूवात झाली असून सध्या पावसाच्या व्यत्ययामुळे विश्वचषक स्पर्धेतील द. आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना काही वेळासाठी थांबविण्यात आला आहे.
The covers are on once again in Cardiff 😓 #SAvAFG pic.twitter.com/iINZzDRQcT
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 15, 2019
पावसामुळं खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्तान संघाच्या 20 षटकांत 2 बाद 69 धावा झालेल्या आहेत. हजरतुल्लाह हा 22 तर रहमत शाह हा 6 धावांवर बाद झाला आहे. तर नूर अली 32 आणि हशमातुल्ला शाहिदी हा 8 धावांवर खेळपट्टीवर टिकून आहेत. आफ्रिका संघाकडून कगिसो रबाडा याने पहिली तर क्रिस माॅरिस याने दुसरी विकेट घेतली आहे.