वेस्ट इंडिजला टी-20 मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज
स्थळ – रोझ बाऊल,साऊथदॅम्प्टन
वेळ – दुपारी 3 वाजता
साऊथदॅम्प्टन – हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, फाफ ड्यु प्लेसिस, डेव्हिड मिलर यासारखे तगडे फलंदाज संघात असुनही केवळ खराब प्रदर्शनामुळे स्पर्धेतील तिनही सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर आज वेस्ट इंडिजचे कडवे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यास दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रयत्नशील असुन आज विजय मिळवत विजयीमार्गावर पुनरागमन करण्यास विंडिजचा संघ प्रयत्नशील असेल.
विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापुर्वी संभाव्य विजेता सामजल्या जाणाऱ्या आफ्रिकेच्या संघाला पहिल्या सामन्यात इंग्लंडने एकतर्फी पराभुत करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. तर, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने आफ्रिकेचा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. यावेळी आफ्रिेक्च्या संघातील प्रमुख गोलंदाज डेल स्टेन आणु लुंगी एन्गिडीयांना दुखापत झाल्याने आधिच अडचणीत असलेला आफ्रिकेचा संघाला मोठा धक्का बसला. यानंतर त्यांना भारतीय संघाविरुद्ध देखील पराभवाची चव चाखावी लागल्याने आफ्रिकेला लागोपाठ तीन पराभवांनासामोरे जावे लागले आहे. आता एकही पराभव स्विकारल्यास त्यांच्या संघाला बाद फेरी गाठण्यात अडचणी येऊ शकतात.
तर, पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांच्या मनात धडकी बसवली असताना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात विजय दृष्टीपथात असताना फलंदाजांनी केलेल्या हिराकिरीमुळे विंडीजला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी गोलंदाज आपली कामगिरी चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना फलंदाजांनी अनावश्यक फटकेबाजी टाळत सावध खेळ करुन टी-20च्या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
दक्षिण अफ्रिका – फाफ ड्यु प्लेसिस (कर्णधार), एडन मरक्रम, हशीम अमला, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुकवायो, डेल स्टेन, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), इम्रान ताहीर, ड्वेन प्रिटोरस, तबरेझ शम्सी, रसी व्हॅन डर दुसे.
वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, फॅबिअन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, शिमोरन हेटमेयर, शाय होप, एल्विन लुईस, अशले नर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), केमार रोच, आंद्रे रसेल, ओशाने थॉमस.