उर्वशी रौतेलाचा फिटनेस व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री म्हटले की फिटनेस आलाच. आजकाल प्रत्येक अभिनेत्री फिटनेससाठी वर्कआऊट करताना दिसते. सोशल मीडियावर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आपल्या फिटनेसचे व्हिडिओ पोस्ट करताना आपण बघतो. त्यातच उर्वशी रौतेलानेही नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये उर्वशी जिममध्ये वर्कआऊट करताना दिसतेय. चेस्ट एक्‍सरसाईज करत असताना उर्वशीनं डंबेल्स हातात घेतलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे हे काही हलके नाही तर तब्बल 12-12 किलो वजनाचे डंबेल्स हाती घेऊन उर्वशी वर्कआऊट करताना दिसते आहे.

उर्वशी रौतेला व्हिडिओमध्ये चांगलीच घाम गाळताना दिसत आहे. तिने हा आपला वर्कआऊटचा व्हिडिओ खास फॅन्ससाठी पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत उर्वशीने लिहिले आहे की, “5 वर्कआऊट करणाऱ्या लोकांना टॅग करा’. उर्वशी आपला फिटनेस फंडा फॅन्ससोबत शेअर करतेय आणि त्यांना फिट राहण्याचा सल्ला देतेय.

उर्वशी नेहमीच आपले बोल्ड फोटो सोशल साईटवर पोस्ट करत असते. अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. सध्या ती “पागलपंती’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असून या चित्रपटामध्ये ती जॉन अब्राहमसोबत स्क्रिन शेअर करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)