आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे आता भाषांतर होणार अधिक सोपे

कोल्हापूर – आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस द्वारे भाषांतर अधिक सोपे होणार आहे. भाषांतर सोप्या पद्धतीने व्हावे यासाठी रियान हे भाषांतर टूल यासाठी उपयुक्त असल्याची माहिती रिकियान टेक्नोलॉजी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदसागर शिराळकर यांनी दिलीय.

काही काळापूर्वी ज्या प्रमाणे विजेमुळे उद्योग क्षेत्रात बदल घडून आला. त्याच प्रमाणे आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) या क्षेत्रातही बदल होत आहे. आतापर्यंत भाषांतराचे कार्य पारंपारिक पद्धतीने केले जात होते. मात्र आता रिकियान टेक्नोलॉजी प्रा. लि. या पुण्यातील कंपनीने भाषांतर सोप्या पद्धतीने व्हावे यासाठी रियान हे भाषांतर टूल तयार केले आहे. हे टूल आनंद सागर शिराळकर यांनी विकसित केलेले असून रियान हे यंत्र आधारित सॉफ्टवेअरआहे जे आता भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) च्या संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार असा अंदाज आहे की २०२१ पर्यंत भारतीय भाषेच्या इंटरनेट वापरकर्त्यांचा टक्का ७५ पर्यंत पोहचेल. भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची वाढती संख्या ही डिजिटल क्रांतीचा आधार बिंदू आहे. प्रादेशिकभाषांना इंटरनेटवर प्राधान्य देण्यासाठी व डिजिटल क्रांतीसाठी स्थानिकीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. तथापि, अद्यापही बहुभाषिक लोकसंख्येपर्यंत पोहचण्यासाठी अनेक प्राथमिक आव्हान आहेत .

शिराळकर म्हणाले, रियान ४० पेक्षा अधिक भारतीय आणि परदेशी भाषांना आणि २०पेक्षा जास्त फाइल चे प्रकार भाषांतर करू शकते. हे साधन एक यूजर फ्रेंडलीइंटरफेस आहे; ते स्वतःची मेमरी तयार करते,ही मेमरी भविष्यातील प्रकल्पांमध्ये वापरण्यासाठी साठविली जाऊ शकते. रियान इतर भाषांतर टूलमधून आपल्या साठ्यामध्ये मेमरी आयात करण्याची परवानगी हीदेतो आणि बऱ्याच वर्षांपासून कामाची सातत्य राखण्यात मदत करतो. प्रोजेक्ट प्रेसेंटेशनचे, स्वरुप व सर्व तांत्रिक तपशीलासह भाषांतर रियान मध्ये करता येणे शक्य आहे.तसेच यामध्ये मोठ्या स्वरूपातील फायली चे भाषांतर करणे, उपशीर्षक तयार करणे आणि फायली वितरीत करणे या टूलद्वारे सोपे झाले आहे. रियानचा वापरहा सर्वांसाठी सुलभ असून,यात हार्डवेअरची आवश्यकता नाही. त्यामुळे याचा वापर घरबसल्या देखील करता येऊ शकतो. रियान मध्ये भाषांतर हे अगदी सोप्या पद्धतीने व जलद गतीने होते. तसेचहे सहज ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे सोपे करते, जेणेकरून लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)