कोल्हापूर जवळील अपघातात 4 ठार 13 जखमी

कोल्हापूर – क्रूझर आणि डंपरमध्ये झालेल्या धडकेत चार जण ठार तर १३ जण जखमी झाले आहेत. कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर भोगावतीजवळ हा अपघात झाला. सर्व जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

भोगावती येथे क्रुझर आणि डंपरचा अपघात झाला आहे. समोरासमोर झालेल्या या भीषण धडकेत चार जण ठार झाले आहेत. तर 13 जण जखमी झाले. प्रकाश मारुती एकावडे (वय ४५, रा. डबल वाडी, ता. राधानगरी), साताप्पा बळवंत गुरव (२८, रा. सोन्याची शिरोली, राधानगरी), ऋषिकेश राजेंद्र पाटील (२३, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), कृष्ण दिनकर गुरव (23, रा. कसबा तारळे) अशी मृताची नावे आहेत. तर, रामचंद्र गणपती पेढे (वय ५०, डुबल वाडी ता.राधानगरी), रंगराव दत्तात्रय चौगुले (४५), सुरज केशव पाटील (18 रा. गुडाळ), उत्तम दिनकर तिबिले (३२, रा.अनाजे, ता.राधानगरी), संदीप गणपती पाटील (२७, रा.अनाजे), राहुल सुरेश पाटील (२४, रा. फेजिवडे), अमित कुंडलिक चौगुले (३०, रा.आवळी बुद्रुक), साताप्पा श्रीपती चौगुले (रा.कुडित्रे, ता.राधानगरी), अमोल सुरेश आसनेकर (२१, रा.पिरळ), सागर आनंदा पाटील (२९), संदीप दत्तात्रय हुजरे (२७, रा. आणाजे), अनिल मधुकर चौगुले (२०, रा. सोन्याची शिरोली) अशी जखमींची नावे आहेत.

क्रुझर आणि डंपरची समोरासमोर जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यात चार जण ठार झाले. तर सहा जण जखमी झाले. घटनास्थळी प्रकाश एकावडे व साताप्पा गुरव यांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारा दरम्यान ऋषिकेश पाटील आणि कृष्णा गुरव यांचा मृत्यू झाला. जखमींना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी सीपीआर आवारात जखमी व मृताच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी गर्दी केली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.