श्रीलंका दौऱ्यात दहशतवादाचे भयानक रूप दिसले – मोदी 

बिश्‍केक – श्रीलंका दौऱ्यादरम्यान दहशतवादाचे अत्यंत भयानक रूप मी पहिले. दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी किरगीझीस्तानची राजधानी बिश्‍केक येथे बोलत होते.

मोदी म्हणाले, भारत आता 2 वर्षांसाठी कायमस्वरूपी एससीओ सदस्य आहे, आम्ही एससीओच्या सर्व उपक्रमांमध्ये सकारात्मक योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एससीओची भूमिका आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी आम्ही गुंतवणूकीची सुरूवात केली आहे. आमची व्हिजा सेवा अधिकपणे एससीओ देशांसाठी उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

दहशतवादावरून पाकिस्तानवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, दहशतवादाविरोधात मानवतावादी शक्तींना एकत्र येण्याची गरज आहे. दहशतवादाचे समर्थन करणारे आणि त्यांना पैसे पुरविणाऱ्या देशांविरुद्ध कठोर कारवाई करावयास हवी. तसेच भारत दहशतवादाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय संमेलन भरविण्याचे आवाहन करते, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)