राज्यात पुन्हा सरकार येणार – राज्यमंत्री भेगडे

कामगारांना घर देणार

कामगार, पर्यावरण पुर्नवसन याबाबत अनेक प्रश्‍न प्रलंबित असून ते सोडविण्यासाठी काम केले जाणार आहे. कामगार नोंदणी कायद्याअंतर्गत कामगारांच्या नावावर कच्चे घर आणि जमीन असेल, त्या कामगाराला घरबांधणीसाठी चार लाख पन्नास हजार रुपये कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर पंधरा दिवसांत दिले जाणार आहे. सदर रक्कम अनुदान स्वरुपात असून त्याचा फायदा कामगारांनी घ्यावा, असे आवाहन राज्यमंत्री भेगडे यांनी केले. 

मंचर – राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येणार आहे, परंतु यासाठी कार्यकर्त्यांनी अंग झटकून काम केले पाहिजे, असे आवाहन कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले आहे.

मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात राज्यमंत्री भेगडे यांचा सत्कार समारंभ आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत विविध विकासकामांचे उद्‌घाटन झाले. यावेळी भाजपचे आंबेगाव तालुकाध्यक्ष संजय थोरात, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष कैलास राजगुरव, डॉक्‍टर सेलचे अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, जिल्हा नियोन मंडळाचे सदस्य भानुदास काळे, अविनाश बवरे, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग ठाकुर, कार्याध्यक्ष रविंद्र त्रिवेदी, संदीप बाणखेले, विजय पवार, क्रांती सोमवंशी, प्रमोद बाणखेले, किरण वाळुंज, भाऊ लंघे, धनेश बाणखेले, संभाजी भोजणे, गणेश थोरात, सुशांत थोरात, राजश्री चिळले यांच्यासह खेड, आंबेगाव, शिरुर, जुन्नर तालुक्‍यातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यमंत्री भेगडे म्हणाले की, मंचर येथून भाजप सदस्य नोंदणीची सुरुवात केली आहे. दर शनिवारी तीन मतदारसंघात अडचणी, समस्या आणि पक्षाला ताकद देण्यासाठी मेळावे घेतले जाणार आहेत. कोणाच्या दहशतीला घाबरण्याचे कारण नाही. पुणे जिल्हा भाजपमय झाला असून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले जाईल. सरकारचा अर्थसंकल्प ग्रामीण भागांना चालना देणारा आहे. रस्ते, पंतप्रधान आवाज योजना, घरकुले, उज्जवला गॅस, लाईटच्या सुविधा दिल्या आहे. ग्रामीण भागाच्या विकास करण्याचा संकल्प या सरकारने केला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन सदावर्ते यांनी केले. सूत्रसंचालन नवनाथ थोरात आणि गणेश कडलक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)