सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 

सातव्या टप्प्यातील 9 वाजेपर्यंत मतदानाची सरासरी टक्केवारी  
नवी दिल्ली – 2019 लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्या पासून लोकशाहीच्या उत्सवाला जोरदार सुरवात झाली असून, आता पर्यंत अनेक ठिकाणी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सातव्या टप्प्यात एकूण 59 जागांसाठी हे मतदान होत. आज सातव्या टप्प्यात सात राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान होत आहे.

यामध्ये बिहारमध्ये 8, हिमाचल प्रदेशमध्ये 4, झारखंड 3, मध्य प्रदेशात 8, पंजाब 13, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 9 तर चंदीगड एका जागेवर मतदान पार पडणार आहे. सुमारे दहा कोटी मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामुळे एकूण 918 उमेदवारांचं भविष्य आज एव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे.

बिहार- 10.65%
हिमाचल प्रदेश- 0.87%
मध्य प्रदेश- 7.16%
पंजाब- 4.64%
उत्तर प्रदेश- 5.97%
पश्चिम बंगाल- 10.54
झारखंड- 13.1 9%
चंदीगड- 10.40% 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)