मुंबई – मुंबई येथील माटुंगा भागात असलेल्या बिग बाजारला आज भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या परिसरात धुराचे साम्राज्य आहे.
माटुंगा येथील तुळशी पाईप मार्गावर असलेल्या बिग बाजारला 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यासंदर्भात माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ही आग लागल्याने परिसरात धुराचे लोटही दिसत आहेत. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचेही कारण समजू शकलेले नाही.