मोदींनी कधीही जातीचे राजकारण केले नाही – अरुण जेटली

अरुण जेटली यांचे मायावती यांना प्रत्युत्तर
नवी दिल्ली – बसप अध्यक्ष मायावतींच्या पंतप्रधान मोदीं राजकारणासाठी जातीचा वापर करत असल्याच्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी कधीही जातीचे राजकारण केले नाही, असे ट्‌वीट जेटली यांनी केले आहे.

बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्वतःच्या जातीचा मागास जातीत समावेश करुन घेतल्याचा आरोप केला होता. त्या आरोपावर जेटली यांनी प्रतिक्रीया दिली आहे. पंतप्रधानांच्या जातीचा काय संबंध? त्यांनी कधीही जातीचे राजकारण केलेले नाही. आतापर्यंत त्यांनी फक्त विकासाचे राजकारण केले आहे’, असे ट्‌वीट जेटली यांनी केले आहे.

तसेच “जातीचे नाव घेऊन जे लोक गरिबांना फसवत आहेत, त्यांना यश मिळणार नाही. जातीचे राजकारण करुन त्यांनी फक्त पैसे कमवले आहेत. बसप किंवा राजद प्रमुखांच्या कुटुंबाकडील संपत्तीच्या प्रमाणात मोदींकडे 0.01 टक्के देखील संपत्ती नाही, असेही जेटली यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी राजकीय फायद्यासाठी त्यांच्या जातीचा वापर केल्याचा आरोप बसप अध्यक्ष मायावतींनी केला आहे. “पंतप्रधान मोदी वरच्या जातीतील आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश करुन घेतला, असा आरोप मायावतींनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.