टेनिस : संजीवनी, सोनल, जिया यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

पाचगणी – रवाईन हॉटेल तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 16 वर्षांखालील मुलींच्या गटात सोनल पाटील हिने रिशीता अगरवालचा 9-1, तर संजीवनी कुतवळने वेदिका माळीचा 9-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. हरश्री आशेर हिने सैशा कारेकरचा 9-7 असा संघर्षपूर्ण पराभव केला. कर्नाटकच्या कनिष्का मल्लेलाने महाराष्ट्राच्या श्रुती नानजकरवर 9-0 असा एकतर्फी विजय मिळविला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

पहिली पात्रता फेरी: 16 वर्षांखालील मुली:

कुंडली माजगैने (महाराष्ट्र) वि.वि. मधुरिमा सावंत (महाराष्ट्र) 9-3;
मिली चुग (महाराष्ट्र) वि.वि. मोहिनी घुले (महाराष्ट्र) 9-3;
वृशिष्ट कुमार (महाराष्ट्र) वि.वि. गौरी माणगावकर (महाराष्ट्र) 9-6;
हरश्री आशेर (महाराष्ट्र) वि.वि. सैशा कारेकर (महाराष्ट्र) 9-7;
नागा रोशनी अरुणकुमार (तामिळनाडू) वि.वि. प्राप्ती पाटील (महाराष्ट्र) 9-5;
संजीवनी कुतवळ (महाराष्ट्र) वि.वि. वेदिका माळी (महाराष्ट्र) 9-0;
गार्गी शहा (महाराष्ट्र) वि.वि. लोलाक्षी कांकरिया (महाराष्ट्र) 9-6;
सोनल पाटील (महाराष्ट्र) वि.वि. रिशीता अगरवाल (महाराष्ट्र) 9-1;
जिया परेरा (महाराष्ट्र) वि.वि. सानिया मोरे (महाराष्ट्र) 9-6;
कनिष्का मल्लेला (कर्नाटक) वि.वि. श्रुती नानजकर (महाराष्ट्र) 9-0.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)