क्रिकेट स्पर्धा : टीसीएस, सायमनटेक संघाची विजयी सलामी

प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे – व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या फेरित टीसीएस, सायमनटेक संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजयी सलामी दिली. टीसीएसने बीएनवाय मेलन संघावर 118 धावांनी दणदणीत विजय मिळवित दिमाखदार आगेकूच केली.

ही स्पर्धा कटारिया हायस्कूलच्या मैदानावर सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत टीसीएसने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 229 धावांपर्यंत मजल मारली. यात मयंक जसोरेने 40 चेंडूंत 9 चौकार व 8 षटकारांसह 94 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर तेजपालसिंगने 21 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह 47 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बीएनवाय मेलन संघाचा डाव 18.1 षटकांत 9 बाद 111 धावांवरच गुंडाळला. मेलन संघाचा प्रकाशकुमार दुखापतीमुळे मैदानात येऊ शकला नाही. मेलन संघाकडून दीपक वसुदेवन याने 42 चेंडूंत नाबाद 50 धावा केल्या.

दुसऱ्या लढतीत सायमनटेक संघाने यूबीएस संघावर 9 गडी राखून सहज मात केली. सायमनटेक संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून यूबीएस संघाला 3 बाद 129 धावांत रोखले. सायमनटेक संघाने विजयी लक्ष्य 15.3 षटकांत 1 गडीच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक – 1) टीसीएस – 20 षटकांत 5 बाद 229 (मयंक जसोरे 94, तेजपालसिंग 47, गौरवसिंग 31, शांतनू नाडकर्णी 21, अक्षय भोंगळे 4-31, अविरल शर्मा 1-37) वि . वि. बीएनवाय मेलन – 18.1 षटकांत 9 बाद 111 (दीपक वसुदेवन नाबाद 50, अभय पी. 3-23, अभिनव कालिया 2-13, गणेश शिंदे 2-9).

2) यूबीएस – 20 षटकांत 3 बाद 129 (अधिभ गजभिये 69, चेतन झाडे नाबाद 30, निखिल भोगले 2-14, जयदीप पाटील 1-43) पराभूत वि. सायमनटेक – 15.3 षटकांत 1 बाद 132 (हृषीकेश पटवर्धन नाबाद 45, अमित सिंघल 38, सानू श्रीनिवासन नाबाद 33, अधिभ गजभिये 1-23).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.