आर्यन, अनमोल, योहान, दीया, स्वरा यांचे सनसनाटी विजय

एमएसएलटीए योनेक्‍स 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा

पाचगणी  – मुलांच्या गटातआर्यन देवकर, अनमोल नागपुरे, योहान चोखणी यांनी तर, मुलींच्या गटात दिया चौधरी, स्वरा काटकर, अलिशा देवगावकर या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत येथे होत असलेल्या रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत आगेकूच कायम ठेवली.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या आर्यन देवकर एनए सातव्या मानांकित हरियाणाच्या वंश नांदलचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(3), 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. बिगरमानांकीत योहान चोखणी याने सातव्या मानांकित आसामच्या जिग्याशमान हजारीकाचे आव्हान 6-1, 6-4 असे संपुष्टात आणले. महाराष्ट्राच्या अनमोल नागपुरेने आपलाच राज्य सहकारी बाराव्या मानांकित अर्णव पापरकरचा 0-6, 6-4, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत चुरशीच्या झालेल्या सामन्यात बिगरमानांकीत महाराष्ट्राच्या दिया चौधरीने आंध्रप्रदेशच्या चौदाव्या मानांकित लक्ष्मी रेड्डीचा टायब्रेकमध्ये 6-1, 6-7(9), 6-0 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. स्वरा काटकर हिने कर्नाटकाच्या दहाव्या मानांकित अमोदीनी नाईकलोक 6-2, 7-6(4) असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या अलिशा देवगावकरने अकराव्या मानांकित तामिळनाडूच्या ज्योशिथा अमुथाचा 7-5, 4-6, 6-3 असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले.

सविस्तर निकाल –

दुसरी फेरी – 14 वर्षाखालील मुले – मानस धामणे(1)(महाराष्ट्र) वि.वि. राधेय शहाणे(महाराष्ट्र)6-1, 6-3, विनित मुत्याल(तेलंगणा) वि.वि. अहान धेकील(उत्तर प्रदेश) 6-0, 6-0, आर्यन शहा(11)(गुजरात) वि.वि. आर्यन हुड(महाराष्ट्र)6-4, 6-2, प्रणव रेथिन(3)(तमिळनाडू) वि.वि. अयान गिरधर (महाराष्ट्र)6-0, 6-2, जोशुवा जॉन इपेन(महाराष्ट्र) वि.वि. ईशान देगमवार(महाराष्ट्र)6-2, 6-1, योहान चोखणी(महाराष्ट्र) वि.वि. जिग्याशमान हजारीका(7)(आसाम) 6-1, 6-4, अनमोल नागपुरे(महाराष्ट्र) वि.वि. अर्णव पापरकर(12)(महाराष्ट्र) 0-6, 6-4, 6-1, आर्यन देवकर(महाराष्ट्र) वि.वि. वंश नांदल(2)(हरियाणा)3-6, 7-6(3), 6-4.

14 वर्षाखालील मुली – दुसरी फेरी – चांदणी श्रीनिवासन(1)(तेलंगणा) वि.वि. शताक्षी चौधरी(उत्तर प्रदेश) 6-0, 6-1, अलिशा देवगावकर(महाराष्ट्र) वि.वि. ज्योशिथा अमुथा(11)(तामिळनाडू) 7-5, 4-6, 6-3, खुशी शर्मा(6)(महाराष्ट्र) वि.वि. कनिष्का श्रीनाथ (कर्नाटक) 3-6, 7-6(1), 1-0सामना सोडून दिला, दिया चौधरी(महाराष्ट्र) वि.वि. लक्ष्मी रेड्डी(14)(आंध्रप्रदेश) 6-1, 6-7(9), 6-0, स्वरा काटकर(महाराष्ट्र) वि.वि. अमोदीनी नाईक(10)(कर्नाटक) 6-2, 7-6(4), श्रीनिधी अमीरेड्डी(तेलंगणा) वि.वि. ह्रिती आहुजा(13)(महाराष्ट्र) 7-5, 6-3, परी चव्हाण(3)(महाराष्ट्र) वि.वि. मिनाक्षी लवकुमार (कर्नाटक)6-1, 6-0, सौम्या रोंडे(तेलंगणा) वि.वि. कायरा चेतनानी(महाराष्ट्र) 6-2, 6-0.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)