टेनिस स्पर्धा : अथर्व जोशी, अर्जुन वेल्लूरी यांची आगेकूच

आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा

पुणे – अथर्व जोशी, अर्जुन वेल्लूरी या खेळाडूंनी आपापल्या गटांतील मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत आगेकूच केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षांखालील मुलांच्या गटात बिगरमानांकीत अर्जुन वेल्लूरी याने चौथ्या मानांकित क्रिशांक जोशीचा 6-5(8-6) असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अथर्व जोशीने तेराव्या मानांकित अर्जुन खलाटेचा टायब्रेकमध्ये 6-5(5) असा पराभव करून आगेकूच केली.

सविस्तर निकाल : दुसरी फेरी:

10 वर्षांखालील मुले : सक्षम भन्साळी(1) वि.वि.वेदांत खानवलकर 5-0; रोहन बजाज वि.वि.आश्रीत माज्जी 5-0; सय्यम पाटील(3)वि.वि.ईशान ओक 5-0; पृथ्वीराज दुधाने वि.वि.राघव सरोदे 5-1; अर्जुन वेल्लूरी वि.वि.कपिल गडियार 5-1; राम मगदूम(5)वि.वि.सुजल तांडगे 5-0.

12 वर्षांखालील मुले : दुसरी फेरी: अभिराम निलाखे(1)वि.वि.आदित्य कामत 6-1; कृष्णा शिंगाडे वि.वि.वीरेन चौधरी 6-0; आदित्य ठोंबरे वि.वि.अनुज कदम 6-4; अथर्व जोशी वि.वि.अर्जुन खलाटे(13) 6-5(5); अर्जुन वेल्लूरी वि.वि.क्रिशांक जोशी(4) 6-5(8-6).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)