क्रिकेट स्पर्धा : एलटीआय, ऍमडॉक्‍सचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

पाचवी एसपीजे कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे  – एलटीआय संघाने हनिवेल संघाचा, तर ऍमडॉक्‍स संघाने विप्रो संघाचा पराभव करत पाचव्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धा सत्य प्रकाश जोशी ग्रुप तर्फे आयोजीत करण्यात आलेल्या आहेत.

व्हेरॉक क्रिकेट मैदान व लेजेंड्‌स क्रिकेट अकादमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत विकास भागवतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर एलटीआय संघाने हनिवेल संघाचा 1 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना शुभम शर्मा व अरमान पटनाईक यांच्या अचूक गोलंदाजीने हनिवेल संघाचा डाव 20 षटकात सर्वबाद 120 धावांत गुंडाळला. 120 धावांचे लक्ष विकास भागवतच्या 54 व प्रतिक सिंगच्या 27 धावांसह एलटीआय संघाने 18.4 षटकांत 9 बाद 121 धावा करत विजयासह उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. विकास भागवत सामनावीर ठरला.

दुसऱ्या लढतीत नविन कटारीयाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऍमडॉक्‍स संघाने विप्रो संघाचा 46 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत गाठली. नविन कटारीया याने 24 चेंडूत 44 धावा व 18 धावांत 3 गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. नविन कटारीया सामनावीर ठरला.

सविस्तर निकाल- साखळी फेरी

हनिवेल- 20 षटकांत सर्वबाद 120 (सुशांत मुधलैर 27, मेहबुबली जळगावकर 21, निरंजन भोसले 17, शुभम शर्मा 4-19, अरमान पटनाईक 2-27, प्रतिक सिंग 1-17) पराभूत वि एलटीआय- 18.4 षटकांत 9 बाद 121 (विकास भागवत 54, प्रतिक सिंग 27, मेहबुबली जळगावकर 3-18, अहमद महोम्मद 3-15, प्रमोद बारवकर 2-25), सामनावीर- विकास भागवत.

ऍमडॉक्‍स- 20 षटकांत 6 बाद 199 (हर्षद खटावकर 48, नविन कटारीया 44, आवेश सय्यद 24, विशाल हिरगुडे 1-19, शब्बीर सय्यद 1-28, सुशांत सिन्हा 1-27) वि.वि विप्रो – 20 षटकांत 7 बाद 153 (विनित वैष्णवी 42, रवीकिरण बयाड 33, आदित्य वर्मा 3-31, नविन कटारीया 3-18), सामनावीर- नविन कटारीया.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.