सुपरमॅनने दिले दीपिकाला जगण्याचे बळ

दीपिका सध्या जरी बॉलिवूडची आघाडीची ऍक्‍ट्रेस असली, तरी सुमारे दशकभरापूर्वी ती डिप्रेशनमध्ये होती, हे तिने एका कार्यक्रमामध्ये स्वतःच सांगितले होते. स्वतःच्या या “क्‍लिनिकल डिप्रेशन’बाबत ती आता काही लपवतही नाही. वेळ पडली, तर या विषयी सर्व काही खरे खरे सांगायला तिला कमीपणा वाटतही नाही. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिने आपली हकिगत सर्वासमोर मांडली आहे.

डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये मिसळण्याबरोबरच स्वतःच्या स्वभावाबाबतचा रिसर्चही तिने केला. एवढेच नव्हे, तर “युथ एंझायटी सेंटर’मध्ये तिने युवकांसाठी तब्बल 75 हजार सेशनही आयोजित केली होती. हे सर्व काही करणाऱ्या दीपिकाबाबत अभिमानच वाटायला पाहिजे.

जगभरात तब्बल 30 कोटी लोक डिप्रेशनमध्ये आहेत. हे डिप्रेशन किंवा एंझायटी कोणत्याही प्रोफेशनमध्ये असलेल्या लोकांना येऊ शकते. कोणत्याही श्रेणीतील लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे नैराश्‍य येऊ शकते. अर्थात आपल्याला डिप्रेशन आहे, हे लक्षात आले तरच त्यातून बाहेर पडता येऊ शकते. आपल्याला नेमके काय झाले आहे, हे समजू न शकल्यामुळेच बराच काळ आपण कोणतीही ट्रीटमेंट घेतली नव्हती, असेही दीपिकाने म्हटले आहे. जेव्हा आपल्याला झालेल्या आजाराला “क्‍लिनिकल डिप्रेशन’म्हणतात, असे समजले तेव्हाच निम्मा आजार बरा झाल्यासारखे वाटल्याचेही तिने सांगितले.

या डिप्रेशनच्या काळात तिने एक गोष्ट शिकून घेतली. त्याचा तिला खूप फायदा झाला. ही गोष्ट म्हणजे संयम राखण्याची आवश्‍यकता समजणे. आपल्या मनातील आशेवरच जगाचा भरवसा आहे, असे सांगताना दीपिकाने चक्क सुपरमॅनचे उदाहरण दिले आहे. सुपरमॅन एकदा म्हणाला होता की, एकदा तुमच्या मनात आशा असली तर जगातील कोणतीही गोष्ट तुमच्यास्ठी अशक्‍य नाही. याच सुपरमॅनने दीपिकाला जगण्याचे बळ दिले. त्या आधारेच दीपिका आज हजारो युवकांना डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचे बळ देते आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here