पर्यटकांच्या वाहनांची कसून तपासणी

हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर

टाकवे बुद्रुक – हुल्लडबाज पर्यटकांमुळे आंदर मावळातील रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, बेशिस्त वाहने चालवून होणारे अपघात रोखण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांकडून फळणे फाटा येथे आंदर मावळात वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. शनिवार व रविवारी या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची पावले आंदर मावळातील सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी वळतात. वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या हुल्लडबाजीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो. ांदर मावळात अरुंद रस्ते असल्याने एका वाहनचालकांच्या चुकीमुळे संपूर्ण वाहतुकीचा खोळंबा होतो.

या पार्श्‍वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांची भेट घेतली होती. पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करावी तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत.

पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली टाकवे बीट अंमलदार भाऊसाहेब कर्डिले यांच्यासह सहा ते आठ पोलीस कर्मचारी आंदर मावळात तैनात ठेवण्यात आले आहेत. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. वाहनामध्ये मद्याच्या बाटल्या आढळ्यास त्या फोडून तरुणांना समज देऊन सोडण्यात येत आहे. वाहतूक कोंडी तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)