जयपुर – दुबई-जयपूर एसजी 58 या विमानाचे सकाळी 9 वाजता इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आले. विमानाचा टायर फुटल्याने जयपूर विमानतळावर विमान उतरवत इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आले. या विमानात एकूण 189 प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. एएनआयने विमानाचे लॅडिंग होतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. व्हिडीओत विमानाचा टायर फुटला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
गतवर्षी 9 फेब्रुवारी रोजी अशीच एक घटना घडली होती. 200 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्पाईसजेट विमानाचे चेन्नई विमातळावर इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आलं होते. टेक ऑफ करताच टायर फुटल्याने हे लॅडिंग करण्यात आले होते. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले होते. पण लॅडिंग होताच विमानाचा दुसरा टायरही फुटला होता. सर्व 199 प्रवासी सुखरुप होते. तशाच प्रकारची घटना पुन्हा एकदा स्पाईसजेटच्या विमाना बाबतीत घडल्याने सगळीकडे स्पाईसजेट वर टिका होत आहे.