“सायको सैयां’ गाण्यात श्रद्धा कपूरचे लटके-झटके

“बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची जोडी आगामी “साहो’ चित्रपटात झळकणार आहे. या स्टारर चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. “सायको सैयां’ असे गाण्याचे बोल असून हे गाणे सध्या खूपच चर्चेत आहेत. या टिझरमधील झलक पाहिली असता चित्रपटात दोघांचा रोमांस रंगत आणणार असल्याचे स्पष्ट दिसून येते.
हे एक धमाकेदार पार्टी सॉन्ग असून यात प्रभास जितका हॅंडसम दिसतो, तेवढीच सुंदर आणि ग्लॅमरस असा श्रद्धा कपूरचा लुक आहे. या गाण्यात श्रद्धा शॉर्ट ड्रेसमध्ये लटके-झटके देताना दिसून येत असून ती प्रभासला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. या गाण्याचे बोल सुजीतचे असून राजू सुंदरम यांनी कोरियॉग्राफर केले आहे.

प्रभासने आपल्या इंस्टाग्रावर टिझरची माहिती देत एक पोस्ट केली आहे. यासोबतच 8 जुलैला संपूर्ण गाणे रिलीज होणार असल्याचे सांगितले. या गाण्याचा टिझर हिंदी, तमीळ, तेलुगू आणि मलयालयमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत.
दरम्यान, 13 जून रोजी “साहो’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टिझरला प्रेक्षकांनी चांगला रिस्पॉन्स दिला होता. यातील ऍक्‍शन सीन आणि दमदार म्युझिकमुळे चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)