तालिबानच्या हल्ल्यात सात सुरक्षा जवान ठार

काबुल – तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या सुरक्षा जवानांवरील हल्ले सुरूच ठेवले असूनत्यांनी सारी पुल प्रांतातील सुरक्षा नाक्‍यांवर हल्ला करून किमान सात सुरक्षा जवानांना ठार मारले आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. रविवारी रात्री हा हल्ला झाला. त्यावेळी त्यांनी दोन सुरक्षा रक्षकांचे अपहरण केले आणि त्यांच्या हल्ल्यात अन्य पाच जण जखमी झाले आहेत. या भागातील तेलविहीरींना संरक्षण देण्याचे काम या सुरक्षा जवानांवर सोपवण्यात आले होते.

या प्रांताच्या राज्यपालांच्या प्रवक्‍त्याने सांगितले की हल्ल्याच्यावेळी सुरक्षा जवानांनीहीं प्रतिगोळीबार केला त्यात चार हल्लेखोर ठार झाले. ही चकमक अनेक तास चालली होती असे ते म्हणाले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याहीं संघटनेने अद्याप घेतलेली नाही. तथापी हे तालिबान्यांचेच कृत्य आहे असे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)