#IPL2019 : दोन्ही संघांना विजेतेपदाची समान संधी होती – महेंद्रसिंग धोनी

हैदराबाद  – यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने विजेतेपद पटकावले असले तरी अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना विजेतेपद पटकावण्याची समान संधी होती असे वक्तव्य चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सामना संपल्यानंतर बोलताना केले आहे.

सामना संपल्या नंतर धोनी म्हणाला की, ही लढत मजेशीर झाली. यात दोन्ही संघ एकमेकांकडे ट्रॉफी पास करत होतो. यावेळी मुंबईच्या संघाने चेन्नईचे तीन झेल सोडले तर, चेन्नईचे दोन फलंदाज धावबाद झाले, यामुळेच धोनीने अशी प्रतिक्रिया दिली. पराभवानंतर ही धोनी चेन्नईच्या गोलंदाजांचे कौतुक करायला विसरला नाही. यंदाच्या मोसमात संघाची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नसल्याचेही धोनीने मान्य केले.

तसेच पुढे बोलताना तो म्हणाला की, आजच्या सामन्यात आम्ही अजून चांगला खेळ करु शकलो असतो. ही लढत मजेशीर झाली. दोन्ही संघ एकमेकांकडे ट्रॉफी पास करत होतो. दोन्ही संघाकडून चुका झाल्या. ज्या संघाने कमी चुका केल्या तो संघ विजयी झाला. असे धोनी म्हणाला.

तसेच पुढे बोलताना धोनी म्हणाला की, आम्ही यंदाच्या मोसमात पहिल्या सामन्यापासून चांगला खेळ केला. महत्वाचे म्हणजे आमच्या सलामीवीरांनी प्रत्येक सामन्यात आम्हाला चांगली सुरूवात करुन देण्यचा प्रयत्न केला. मात्र, आमच्या मधल्या फळीतील फलंदाजांना यंदा चमकदार कामगिरी करण्यात अपयश आल्याने आमच्यावर दबाव आला होता. त्याचाअच प्रत्यय आजच्या सामन्यातही आपल्याला पहायला मिळाला आहे. असे म्हणत धोनीने फलंदाजांची कान उघडनी केली.

तसेच यावेळी त्याने आपल्या गोलंदाजांचे कौतूक करताना सांगितले की, आमच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांनी चांगल्या सुरूवातीनंतरही मुंबईच्या संघाला 150 धावांच्या आत रोखण्यात यश मिळवले हे आमच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते. अंतिम सामन्यातच नव्हे यंदाच्या मोसमातील प्रत्येक सामन्यात आमच्या संघाला विजय मिळवून देण्यात गोलंदाजांचा सहभाग मोठा होता. मात्र, आमच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. असे म्हणत धोनीने आपल्या संघातील गोलंदजांचे कौतूक केले.

तसेच पुढच्या वर्षी आमचे काय प्लानिंग असेल याच्या विषयी बोलणे हे खूप लवकर बोलणे होईल कारण त्याला अजुन एक वर्स आहे. त्यातच आमचे आता मुख्य लक्ष्य हे इंग्लंड येथे होणारी विश्‍वचषक स्पर्धा असून आम्हाला त्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे. असेही त्याने यावेळी नमूद केले. तसेच पुढच्या वर्षीही आयपीएलमध्ये खेळणार का या प्रश्‍ना विषयी बोलताना धोनी म्हणाला की, आशा करतोय की आपण पुढच्या वर्षी भेटुया असे म्हणत त्याने उत्तर देणे टाळले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)