सात जणांनी घेतली माघार

मावळ लोकसभा ; 21 उमेदवार रिंगणात

पिंपरी – मावळ लोकसभा निवडणुकीच्या आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकुण 21 जण शिल्लक राहिले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खरी लढत होणार असली तरी उर्वरित 19 जणही आपले नशिब अजमावत आहेत. आज उमेदवारी माघारीची मुदत संपुष्टात आल्याने मावळचे चित्रही स्पष्ट झाले आहे.

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी 9 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीमध्ये 32 जणांनी आपले अर्ज सादर केले होते. तर 10 एप्रिल रोजी झालेल्या छाननीमध्ये 4 जणांचे अर्ज बाद ठरले होते. अर्ज मागे घेण्याच्या दोन दिवसांपैकी गुरुवारी 11 रोजी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नव्हता. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी कितीजण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी माघार घेतली. बळीराजा पार्टीचे गुणाट संभाजी नामदेव, हिंन्दुस्थान जनता पार्टीचे भीमराव आण्णा कडाळे, अपक्ष जाफर खुर्शीद चौधरी, धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे, नूरजहॉं यासीन शेख, डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले, प्रकाश नैनूमल लखवाणी या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेण्याची अवधी शुक्रवारी संपली असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार आणि शिवसेना-भाजप महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यात खरी लढत होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात 21 उमेदवार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व इतर पक्षांच्या आघाडीचे पार्थ पवार, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, बहुजन समाज पार्टीचे संजय किसन कानडे, क्रांतिकारी जयहिंद सेनेचे जगदीश शामराव सोनवणे, आंबेडकर राईट्‌स पार्टी ऑफ इंडियाच्या जया संजय पाटील, बहुजन मुक्‍ती पार्टीचे पंढरीनाथ नामदेव पाटील, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक, भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचे मदन शिवाजी पाटील, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे सुनील बबन गायकवाड, अपक्ष अजय हनुमंत लोंढे, अमृता अभिजीत आपटे, नवनाथ विश्‍वनाथ दुधाळ, प्रशांत गणपत देशमुख, बाळकृष्ण धनाजी घरात, राकेश प्रभाकर चव्हाण, राजेंद्र मारुती काटे, विजय हनुंमत रंदिल, सूरज अशोकराव खंडारे, सुरेश श्रीपती तौर, डॉ. सोमनाथ अर्जुन पौळ हे 21 उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)