फुटीरतावादी आसिया अंद्राबीचे घर सील

जम्मू – जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरतावादी महिला नेता आसिया अंद्राबीविरूद्ध राष्ट्रीय तपास पथकाने मोठी कारवाई करत तीचे श्रीनगर येथील घर सील करण्यात आले आहे. टेरर फंडिंगप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता तिची पूर्ण चौकशी होईपर्यंत अंद्राबी आपले घर विकू शकत नाही किंवा त्याचा वापर व्यावसायीक कारणांसाठी करु शकत नाही.

मुंबई स्फोटाचा सुत्रधार हाफिज सईद याच्या आदेशनुसार काश्‍मीर खोऱ्यात भारतीय जवानांवर दगडफेक घडवून आणल्याचा आरोपही अंद्राबीवर आहे. काश्‍मीर विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतलेली अंद्राबी चार वर्षांपूर्वी पाकिस्तानी झेंडा फडकावून पाकिस्तानी राष्ट्रगीत गायल्यामुळे चर्चेत आली होती.

मागील महिन्यात देशाविरूद्ध युद्ध छेडण्याच्या आरोपाखाली फुटीरतावादी शब्बीर शाह, यासिन मलिक, आसिया अंद्राबी, दगडफेक घडवून आणणारा पोस्टर बॉय मसरत आलम आणि जहूर वटाली यांना ताब्यात घेतले आहे. अंद्राबी सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. चौकशीदरम्यान, पाकिस्तानातून तिला काश्‍मीर खोऱ्यात आपल्याला दुख्तरान-ए-मिल्लत या संघटनेकडून महिलांचे आंदोलन घडवून आणण्यासाठी पैसा मिळत असल्याचे अंद्राबीने कबूल केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)