सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरीना ही जोडी पाच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. यात दोघांचा तरुणपणापासून तर वयोवृद्धचा जीवन प्रवास दाखविण्यात आला आहे.

‘भारत’ या चित्रपटात सलमान खान मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासह कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, नोरा फतेही, सुनील ग्रोवरही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर तर निर्मिती अतुल अग्निहोत्री करत आहे. नेहमीप्रमाणे सलमान खानचा हाही चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

या ट्रेलरने युट्युबवर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत हा ट्रेलर 3 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

 

https://www.youtube.com/watch?time_continue=180&v=Ea_GKoe81GY

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)