जलसंधारणासाठीही जनआंदोलन उभारावे – नरेंद्र मोदी

देशात पाणी प्रश्न आजच्या स्थितीत गंभीर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिल्यांदा ‘मन की बात’द्वारे जनतेशी संवात साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी जल संरक्षणाचं महत्त्व बोलून दाखवलं आणि देशातील विविध भागातील पाणीटंचाईवरही भाष्य केलं. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या याबाबतही माहिती दिली.

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. देशातील नागरिकांना ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाला जन आंदोलनाचे स्वरुप दिले होते, त्याप्रमाणे जलसंधारणासाठीही सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

देशात जलसंधारणाच्या अनेक पारंपरिक पद्धती आहेत, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत. त्या विविध पद्धतींची माहिती एकमेकांना दिली पाहिजे. तसेच जलसंधारणासाठी काम करणाऱ्या एखाद्या व्यक्ती किंवा खासगी संस्थेबद्दल माहिती असल्यास, त्याची माहिती इतरांना दिली पाहिजे, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.

देशात पाणी प्रश्न आजच्या स्थितीत गंभीर बनत चालला आहे. त्यासाठी लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवायला हवे, असे आवाहन त्यांनी केलक. पाण्याच्या संरक्षणासाठी लोकांनी #JanShakti4JalShakti या हॅशटॅगचा उपयोग करत सोशल मीडियावर आपल्याकडील माहिती शेअर करावी, असेही मोदींनी आवाहन केले.

देशातील जनतेने पुन्हा देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल नरेंद्र मोदींनी सर्वांचे आभार मानले. जनतेला विकास हवा आहे, म्हणून त्यांनी पुन्हा देशसेवा करण्याची संधी दिल्याचे त्यांनी म्हटले. सत्तेत मी आलो नाही, तर लोकांनीच मला परत आणले आहे, असेही मोदींनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)