प्रतापगढ – काँग्रेसच्या उत्तरप्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी सडकून टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला असून त्या म्हणाल्या, “मी नरेंद्र मोदी यांच्यासारखा घाबरट आणि दुबळा पंतप्रधान माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये पहिला नाही. राजकीय शक्ती ही मोठं-मोठ्या निवडणूक सभा घेऊन आणि सतत टीव्हीवर झळकून प्राप्त होत नसते. जनतेला सर्वोच्च शक्ती मानण्यातचं खरी राजकीय शक्ती आहे. जनतेच्या समस्या ऐकून घेण्याची शक्ती, जनतेच्या समस्या सोडवण्याची शक्ती, आपल्यावर करण्यात येणाऱ्या टीकेला स्वीकारण्याची शक्ती, विरोधकांची भूमिका जाणून घेण्याची शक्ती यातच खरी राजकीय शक्ती दडलेली असते. मात्र हे पंतप्रधान तुमचं ऐकून घ्यायचं तर सोडाच मात्र तुम्हाला उत्तर देण्याचं त्यांचं कर्तव्य देखील पार पडत नाहीत.”
तत्पूर्वी दिल्लीमध्ये काल एका रोड शोला संबोधित करताना प्रियंका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधताना, ” निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यात नोटाबंदीवर लढा, जीएसटीवर लढा, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लढा आणि देशातील तरुणांना तुम्ही जी खोटी आश्वासने दिलीत त्यावर लढा, जी फसवणूक केलीत त्यावर लढून दाखवा.”असं खुलं आव्हान दिलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना ‘भ्रष्टाचारी नंबर १’ असं संबोधल्यानंतर प्रियंका गांधी या सातत्याने पंतप्रधानांवर टीका करीत असून त्यांनी यापूर्वी त्यांनी पंतप्रधानांची तुलना महाभारतातील दुर्योधनाशी केली होती.
Congress General Secretary for UP East, Priyanka Gandhi Vadra in Pratapgarh: Inse bada kaayar, inse kamzor Pradhanmantri maine zindagi mein nahi dekha hai. Rajnaitik shakti bade bade prachaar se nahi aati hai, TV pe dikhaane se nahi aati hai. pic.twitter.com/d6NeVKKa2A
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 9, 2019