कोल्हापूर: कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात मतदान केंद्रावरील तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास ४ हजार मतदान केंद्रावर सुमारे ३५ लाख मतदार मतदान करणार आहेत. २०० हुन अधिक मतदार केंद्र हे संवेदनशील असून ६५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सूचना पत्रक लावण्यात आली असून मतदान केंद्रावरील तयारी पूर्ण झाली असून झाली आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाचं प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.