पिंपरी – चिंचवडगाव येथे लागलेल्या आगीत तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. ही घटना रविवारी (दि. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगाव येथील एका वाडा सदृश्य इमारतीमध्ये आग लागल्याची वर्दी त्यांना मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत आस्वाद हॉटेल, कृष्णा इस्टेट एजन्सी यासह आणखी एका दुकानातील साहित्य जळून मोठे नुकसान झाले. गॅस गळतीमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.