#IPL2019 : कोलकाताचा राजस्थानवर दणदणीत विजय

जयपूर -गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 37 चेंडू आणि 8 गडी राखून पराभव करत आगेकूच केली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 3 बाद 139 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना कोलकाताने धडाकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या सहा षटकांमध्येच 65 धावांची भागिदारी रचली. यानंतरही आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवत दोघांनी पहिल्या गड्यासाठी 8.3 षटकांत 91 धावांची भागिदारी केली. यावेळी सुनील नारायणने 25 चेंडूत 47 धावांची खेळी केली.

नारायण बाद झाल्यानंतर ख्रिस लिनने आक्रमणाची धुरा आल्याकडे घेत अर्धशतकी खेळी करून कोलकाताच्या संघाला 10 व्या षटकातच शंभरी पार करून दिली. यावेळी कोलकाताच्या 114 धावा झाल्या असताना ख्रिस लिन 32 चेंडूत 50 धावा करून परतला. यानंतर रॉबिन उथप्पा आणि शुभमन गिलने कोलकाताच्या विजयाची औपचारिकता 14 व्या षटकात पूर्ण केली.

तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. कर्णधार अजिंक्‍य रहाणे 5 धावांवर बाद झाला. यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी सावधपणे फलंदाजी करत राजस्थानने 10 षटकांत 1 बाद 56 धावांची मजल मारून दिली. यानंतर वेगाने धावा करण्याच्या नादात बटलर 37 धावा करून परतला. तर, राहुल त्रिपाठी केवळ 6 धावा करून परतल्यानंतर आलेल्या बेन स्टोक्‍सच्या साथीत स्मिथने राजस्थानला 139 धावांची मजल मारून दिली. यावेळी बेन स्टोक्‍सने 14 चेंडूत 7 तर स्टिव्ह स्मिथने 59 चेंडूत 73 धावांची खेळी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.