#ICCWorldCup2019 : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

टॉंटन – ऑस्ट्रेलियाविरूध्दची निराशाजनक कामगिरीची मालिका खंडित करण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना खडतर परिक्षेस सामोरे जावे लागणार आहे. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत आज येथे होणाऱ्या या लढतीत चुरशीची अपेक्षा आहे.

पाकिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलिया हा सामना थोड्याच वेळात टॉंटन येथील काउंटी मैदानावर सुरू होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानने जिंकला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियास फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूध्द पाकिस्तानने गेल्या चौदा सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. जानेवरी 2017 मध्ये झालेल्या लढतीत त्यांनी विजय मिळविला होता. या सामन्यात त्यांच्या मोहम्मद हफीझ याने शैलीदार खेळ करीत सिंहाचा वाटा उचलला होता. आजही त्याच्यावर पाकिस्तानची मोठी भिस्त आहे. यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत पाकिस्तानने इंग्लंड संघावर सनसनाटी विजय मिळविला असून त्या विजयातही मोहम्मद हफीझ याने केलेल्या तडाखेबाज खेळाचा महत्वाचा वाटा होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)