अबब!

– अॅप डाऊनलोड करणे आणि त्यावरून आपले व्यवहार पूर्ण करणे, हे आता सर्वाच्या सवयीचे झाले आहे. त्यामुळे जगभरात अॅपवरून होणाऱ्या व्यवहारांतून मिळणारा महसूलही वाढत चालला आहे. ताज्या आकडेवारीनुसार अॅपल अॅप आणि गुगल प्ले अॅप चा या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यातील महसूल ३९.७ अब्ज डॉलरवर गेला आहे. म्हणजे वर्षाला त्यात १५.४ टक्के वाढ नोंदविली गेली आहे.

– जून हा बहुतेक इन्शुरन्स काढण्याचा महिना दिसतो आहे. कारणयावर्षी सर्व इन्शुरन्स कंपन्यांनी या महिन्यात ३२ हजार २४१ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा करून घेतला आहे. जो गेल्या जूनमध्ये फक्त १६ हजार ६११ कोटी रुपये होता. याचा अर्थ त्यात९४टक्के वाढ नोंदविली गेली आहे.त्यात अर्थातच सरकारी एलआयसीचा वाटा २६ हजार ३० कोटी रुपये एवढा आहे. जूनमध्ये एलआयसीने१३.३२ लाख पॉलिसींची विक्री केली आहे.

– अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेत येणाऱ्या नागरिकांना रोखण्याचा प्रयत्न करत असले तरी भारतीय तरुणांना अजूनही अमेरिकेत मोठी मागणी आहे. त्यामुळेचगेल्या पाच वर्षांत अमेरिकेने जेवढे एच १ बी व्हिसा दिले त्यातील ७० टक्के व्हिसा भारतीयांना मिळाले आहेत. या व्हिसामुळे भारतीय तरुण अमेरिकन कंपन्यांत काम करू शकतात.

– भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या २०१९ च्या पहिल्या चार वर्षात वाढली आहे. या चार महिन्यात ३९.३ लाख परदेशीपर्यटक भारताला भेट देऊन गेले. ही संख्या २०१८ च्या याच चार महिन्यांपेक्षा १.९ टक्के अधिक आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)